पेट्रोल दरवाढीमुळे वाहनचालकांना त्रास
अंबाजोगाई - पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल पेडगावकर यांनी केली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे पालकांत चिंता
अंबाजोगाई - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अंबाजोगाई तालुक्यात दररोज दोन अंकी रुग्णसंख्या वाढत चालली आहे. नुकत्याच इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. महाविद्यालयेही दोन दिवसांपूर्वी सुरू झाली. अशा स्थितीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे की नाही, याबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने पालकांची चिंताही वाढली आहे.