शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्राने केला घात; वीटभट्टी चालकाच्या खूनाचा झाला उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 7:29 PM

फारुख लतीफ मोमीन (वय ४५, रा. कोठाड गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत वीटभट्टी चालकाचे नाव आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा वेगवान तपास; २४ तासात आरोपी जेरबंद

अंबाजोगाई ( बीड ) : शहरातील बेपत्ता झालेल्या वीटभट्टी चालकाचा मृतदेह दोन दिवसानंतर अंबाजोगाई परळी रोडवर वरवटी-पिंपळा शिवारात आढळून आला होता. त्या वीटभट्टी चालकाच्या मित्रानेच वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून अन्य एकाच्या मदतीने त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अवघ्या २४ तासात या खुनाचा मागोवा काढण्यात बर्दापूर पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपीला रेणापूर येथून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

फारुख लतीफ मोमीन (वय ४५, रा. कोठाड गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत वीटभट्टी चालकाचे नाव आहे. फारुख यांची धायगुडा पिंपळा दूरदर्शन केंद्राजवळ वीटभट्टी आहे. रविवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता फारूख हे काही कामानिमित्त घराबाहेर पडले. रात्री ८.३० वा. त्यांच्या मुलीने फोन करून त्यांना जेवण करण्यासाठी बोलावले असता त्यांनी १० मिनिटात येत असे सांगितले. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत. अखेर मंगळवारी (दि.२४) कुटुंबियांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 

वाढदिवसाच्या पार्टीला गेल्याची मिळाली माहितीफारुख यांचा मुलगा मोमीन नाजेश फारुख याने वडिलांचे मित्र शेख अझर आली जाकेर अली यांच्याकडे विचारपूस केली. वरवटी येथील मित्र मारुती उर्फ वाघ्या हनुमंत चाटे (वय ३४, रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फारुख मला घेऊन शेपवाडीजवळील एका ढाब्यावर गेले होते असे अझर यांनी सांगितले. वाढदिवस साजरा करून अझर अंबाजोगाईला परतले तर फारुख, वाघ्या आणि अनोळखी एकजण असे तिघे दुचाकीवरून वरवटीच्या ढाब्यावर जेवणासाठी गेले अशी माहिती अझर यांनी दिली. 

गिरवली शिवारात आढळला मृतदेहदरम्यान, मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास परळी अंबाजोगाई रोडवर गिरवली शिवारात मुंडे यांच्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरून तो फारुख यांचा असल्याची ओळख त्यांच्या मुलाने पटविली. चेहऱ्यावर दुखापत करून आणि शरीरावर मुक्कामार देऊन फारुख यांचा खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले.

पोलिसांचा वेगवान तपास; २४ तासात आरोपी जेरबंदमृतदेह आढळताच बर्दापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. ठाणे प्रमुख एपीआय रवींद्र शिंदे यांनी पोलिसांचे एक पथक खुनाच्या तपासकामी लावले. पोलिसांनी या घटनाक्रमातील प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली. त्यातून वाघ्या चाटे यानेच खून  केल्याच्या निर्णयाप्रत पोलीस पोहोंचले. त्यानंतर एपीआय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चोपणे, केंद्रे, महादेव आवले, सूर्यवंशी, जमादार यांनी वाघायचा तपास सुरु केला. तो रेणापूर येथे असून फरार होण्याच्या बेतात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तातडीने रेणापूर गाठले आणि गुरुवारी पहाटे अक्षरशः फिल्मी स्टाईलने रोडवर धावत वाघ्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच  त्याने वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून फारुख यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मोमीन नाजेश फारुख यांच्या फिर्यादीवरून वाघ्या चाटे आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीवर बर्दापूर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, वाघ्या चाटे अद्यापही तोंड उघडत नसल्याने या खुनामागचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. वाघ्याला शुक्रवारी (दि.२७) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू