शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

वाराणसीवरून भैरवनाथाच्या जलाभिषेकासाठी सात वर्षांपासून कावड आणतोय मुस्लिम मावळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 1:13 PM

विशेष म्हणजे, शिवजयंतीला मावळा वेश परिधान करून शिवनेरी ते सांगवी गावी पायी ज्योत समीर घेऊन येतो.

- नितीन कांबळेकडा ( बीड) : 'तू हिंदू बनेगा ना, मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद हे तू इन्सान ही बनेगा' अगदी या गीताप्रमाणे सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवत मुस्लिम मावळा समीर शेख हा वाराणसीहून ग्राम दैवत भैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यात जलाभिषेकासाठी कावड घेऊन येत आहे. विशेष म्हणजे, मागील सात वर्षांपासून समीर मनोभावे कावड आणून सर्वधर्मसमभावाचा मोठा संदेश देत आहे.

आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथील समीर शेख हा मुस्लिम तरूण उच्च शिक्षित आहे. धर्माच्या भिंती तोडत समीर कायम सामाजिक कार्यात अग्रसर आहे. गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवाच्या जन्मोत्सव सोहळ्यात देखील त्याचा सक्रिय सहभाग आहे. यातूनच मागील सात वर्षांपासून भैरवनाथाला जलाभिषेक करण्यासाठी गावातील भाविकांसोबत १५०० किलोमीटर दूर वाराणसी येथे जात समीर कावड घेऊन येतो. मुस्लिम तरुणाची अशी धर्मवीरहित कृती आदर्श घालून देत आहे. सर्वधर्मसमभावचे दर्शन घडवणाऱ्या समीरचे कावड आणण्याचे यंदाचे सातवे वर्ष आहे. विशेष म्हणजे, शिवजयंतीला मावळा वेश परिधान करून शिवनेरी ते सांगवी गावी पायी ज्योत समीर घेऊन येतो.

आपण सर्व भारतीय आहोत.जातीचा कुठलाच गर्व नसावा. सर्वधर्मसमभाव जपला जावा. यासाठी मी कायमच प्रयत्न करत राहील. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे काम सुरू ठेवणार असल्याचे समीर शेख यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :BeedबीडHinduहिंदूMuslimमुस्लीम