गेवराई : तालुक्यातील सिरसदेवी येथील कापसाच्या व्यापाºयाने गेवराई शहराजवळील एका जिनिंग समोर चारचाकी लावली होती. या गाडीची काच फोडून आतील ९ लाख १५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील सिरसदेवी येथील कापसाचे व्यापारी बळीराम खरवडे यांनी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला होता. त्यांचे पैसे देण्यासाठी सोमवारी दुपारी गेवराई येथील एका बँकेमधून ७ लाख व दुसºया एका बँकेतून २ लाख १५ हजार असे ९ लाख १५ हजारांची रक्कम काढली होती.ती रक्कम आपली चारचाकी (क्रमांक एम.एच.२३ ए.डी ९००१) मध्ये ही रोकड असलेली बॅग ठेवली होती. ते गावाकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांनी बीड रोडवरील एका जिनिंगजवळ रस्त्याच्या कडेला गाडी लावून ते जिनिंगमध्ये काही कामानिमित्त गेले होते. मात्र, वापस आले असताना गाडीची काच फुटलेली त्यांना दिसली. त्यांनी तात्काळ गाडीजवळ धाव घेऊन पाहणी केली असता पैशाची बॅग लंपास झाल्याचे त्यांना दिसून आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ जिनिंगमधील काही जणांना या घटनेची माहिती दिली. मात्र, ९ लाख १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ गेवराई पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली.यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. व्यापारी खरवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.
जिनिंगसमोरील गाडीची काच फोडून व्यापाऱ्याचे ९ लाख लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:20 AM