बीड : आरोग्यकर्मींपाठोपाठ आता इतर विभागातील फ्रंटलाईन वर्कर्सलाही कोरोना लस दिली जात आहे. परंतु त्यांनी या लसीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. दोन दिवसांत केवळ ३८९ लाभार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे. तसेच एकूण टक्काही घसरत असल्याचे दिसते.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लस देण्यास सुरूवात झाली. सर्वात आगोदर आरोग्य विभागातील लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यापाठोपाठ गुरूवारपासून पोलीस व इतर विभागाचे फ्रंटलाईन वर्कर्सलाही लस टोचण्यास सुरूवात झाली. यासाठी बीड, अंबाजोगाई, परळी, गेवराई, पाटोदा, आष्टी, धारूर, केज येथे लसीकरण केंद्र तयार केले. असे असले तरी दोन दिवसांत केवळ ३८९ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.
दरम्यान, शुक्रवारी ३५२ आरोग्यकर्मी व ३११ फ्रंटलाईन वर्कर्स असे ६६३ लोकांनी लस घेतली. तसेच आतापर्यंत ६ हजार ९९२ आरोग्यकर्मी व ३८९ फ्रंटलाईन वर्कर्स असे७ हजार ३८१ लोकांनी कोरोना लस घेतली आहे.
ग्रा.पं.कर्मचारी, शिक्षकांनाही लस
सुरूवातीला आरोग्यकर्मी, त्यापाठोपाठ पोलीस व इतर विभागाचे फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यासाठी बोलावण्यात आले. आता ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक व कोरोना काळात ज्यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केले आहे, अशांना लस दिली जाणार आहे. याबाबत सर्व गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्रही काढले आहे. याचा आढावा म्हणून व्हिडीओ काॅन्फरन्स घेण्यात आल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम यांनी दिली.
अशी आहे आकडेवारी
केंद्र आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर्सएकूण
आष्टी ९३३ ४० ९७३
बीड 12621141376
गेवराई83048878
अंबाजोगाई998511049
परळी1006411047
माजलगाव53107538
पाटोदा55108559
केज 38440424
धारूर49740437
एकूण69923897381