गेवराईत इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:55 PM2018-10-11T23:55:29+5:302018-10-11T23:56:32+5:30

केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरलच्या दरामध्ये सारखी घसरण होत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसला जी.एस.टी.अंतर्गत आणा व राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपल्बध करावा, अशी मागणी करत गुरूवारी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

Fuel price hike | गेवराईत इंधन दरवाढीचा निषेध

गेवराईत इंधन दरवाढीचा निषेध

Next
ठळक मुद्देयुवक काँग्रेस आक्रमक : पेट्रोल पंपावर सरकार विरोधात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरलच्या दरामध्ये सारखी घसरण होत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसला जी.एस.टी.अंतर्गत आणा व राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपल्बध करावा, अशी मागणी करत गुरूवारी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
‘अच्छे दिन’ च्या नावाखाली लुटण्याचे काम सरकार करीत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची भाववाढ करु न सर्वसामान्यांना संकटाच्या खाईत लोटणारे बेजबाबदार सरकार आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ झाली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार या दर वाढीला जबाबदार असल्याचा आरोप करत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीनिवास बेदरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. माजी खा.रजनी पाटील व युकाँचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील यांच्या आदेशानुसार कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील कृष्णकांत पेट्रोल पंपावर जाऊन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी परिसरात रस्त्यावर उभे असलेल्या वाहनधारकांना २०१४ ते २०१८ या चार वर्षाच्या दरम्यान झालेल्या दरवाढीचे पत्रक देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष किरण आजबकर, बळीराम गिराम, योगेश बोबडे, नीलेश तौर, दयानंद सोनवणे, गणेश तापडिया, विकास बरडे, अनिल जावळे, महेश जगताप, आशिष शिंदे, गोविंद ठोसर, करन चाळक, सौरभ शर्मा, विशाल जंगले, गोटू सावंत, अक्षय बेदरे, नीलेश मळवे, नितीन खारगे, विशाल खटावकर, मेघराज बेदरे, जिजा जगताप, सय्यद अतीकसह अनेकजण उपस्थित होते.
सर्वसामान्यांना लोटले संकटात
युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी करुन २०१४ ते १८ या चार वर्षांत झालेल्या दरवाढीचे पत्रक देऊन निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंच्या भाववाढीला केंद्र व राज्य सरकार जबाबदार धरुन हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.