बीड : परळी शहरातील बसवेश्वरनगर भागात घरफोडी करण्यात आली होती. यामध्ये सोने व इतर वस्तू चोरी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.हनुमंत सावळाराम जोगदंड याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने बसेवश्वरनगरात घरफोडी केली होती. यामध्ये मोबाईल, शिलाई मशीन, एलईडी टीव्ही, सोने असा मुद्देमाल चोरुन नेला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पथक करीत होते. शाखा प्रमुख भारत राऊत यांना परळी शहरातील वडसावित्रीनगर भागात राहणा-या हनुमंतच्या घरी हे चोरीचे सामान असल्याची खात्रीलायक माहिती खबºयामार्फत मिळाली होती. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जोगदंडवर पाळत ठेवत परळी शहरातून एका टपरीसमोरुन त्याला अटक केली. पोलीस पाळतीवर असल्याचे लक्षात येताच जोगदंडने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला गाठलेच. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच चोरी करण्यासाठी सोबत असलेले शेख अझम, शेख अमर उर्फ गुड्ड्या शेख बाबू (दोघेही रा. वडसावित्रीनगर) यांची नावे सांगितली. तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिने घाटनांदूर येथील सोनार बंडू उध्दव दहीवाळ याला विकल्याचे कबूल केले. यावरुन आरोपी हनुमंत जोगदंड, सोनार बंडू दहीवाळ यांना परळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पो. नि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप नि. संतोष जोंधळे, बालाजी दराडे, तुळशीराम जगताप, मुंजाबा कुवारे, भास्कर केंद्रे, साजेद पठाण, नरेंद्र बांगर, चालक हारके यांनी केली.
परळीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला केले गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:15 AM