शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

स्पोर्टस् क्लबमध्ये जुगाराचा खेळ, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह ५० जणांवर गुन्हा, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 11:34 AM

Crime News in Beed : भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत हा अड्डा सुरु होता, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बीड: स्पोर्टस् क्लबच्या नावाखाली राजरोस सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर केजचे सहायक अधीक्षक व आयपीएस पंकज कुमावत यांनी छापा टाकून ४७ जणांना रंगेहाथ पकडले. २८ डिसेंबर रोजी ११ वाजता शहराजवळील तळेगाव शिवारात ही कारवाई केली. यावेळी पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत हा अड्डा सुरु होता, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (FIR against 50 including Beed BJP district president Rajendra Maske in gambling case )

आयपीएस पंकज कुमावत यांनी यापूर्वी गुटखा प्रकरणात धडक कारवाया केल्या. बीडमधील गुटख्याच्या गोदामावर टाकलेल्या धाडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद केल्याने कुमावत चर्चेत आले होते. पाठोपाठ त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेतील जुगारअड्डयाचा पर्दाफाश केला. २८ डिसेंबर रोजी रात्री ११: १० वाजता त्यांनी चऱ्हाटा रोडवरील तळेगाव शिवारात स्पोर्टस् क्लबच्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी ४७ जणांना तिर्रट खेळताना रंगेहाथ पकडले. रोख १ लाख ५१ हजार ९४० रुपये , दोन चारचाकी, जुगार साहित्य व मोबाइल असा एकूण ७५ लाख ६२ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

हवालदार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन जुगार खेळताना आढळलेल्या ४७ जणांसह स्पोर्टस् क्लबचा मालक कल्याण पवार, जागा किरायाने घेणारा भाऊसाहेब सावंत व मूळ जागामालक भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक पंकज कुमावत, हवालदार बालाजी दराडे, सचिन अहंकारे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, रामहरी भंडाणे, बीड ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे व सहकाऱ्यांनी केली.

किरायाची जागा किरायाने...तळेगाव शिवारातील ही जागा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची आहे. कल्याण पवार (रा.दगडी शहाजानपूर ता.बीड) यांनी स्पोर्टस् क्लबसाठी ती किरायाने घेतली होती. पत्र्याचे शेड उभारुन त्यात स्पोर्टस् क्लब तयार केले होते. मात्र, नंतर पवार यांनी ही जागा भाऊसाहेब सावंत (रा.नवी मुंबई ) यांना किरायाने दिली. तेथे स्पोर्टस् क्लबच्या आडून जुगाराचा खेळ सुरु होता, त्यामुळे तिघांनाही आरोपी केले आहे. पार्टी विथ डिफरन्सची शेखी मिरवणाऱ्रूा भाजप पदाधिकाऱ्रूाच्याचे नाव जुगार अड्ड्याशी जोडले गेल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी