परळी शहरातील गणेशपार रोड, स्टेशन रोड, टॉवर रोड, बाजार समिती परिसर, नाथ रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असून त्यात पावसाचे पाणी साठल्याने चिखल झाला आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि मुलांच्या अंगावर चिखल उडत आहे. नगरपालिका प्रशासनाला नागरी समस्यांचे काही घेणे देणे नसल्याचा आरोप भाजयुमोने केला. सोमवारी रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करत धिक्कार आणि निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. आंदोलन वेळी मोहन जोशी,सचिन गित्ते,नरेश पिंपळे,ॲड.अरुण पाठक, योगेश पांडकर,अश्विन मोगरकर,सुशील हरंगुळे,गोविंद चौरे,वैजनाथ रेकने,बंडू नाना कोरे,गणेश होळंबे,श्रीपाद शिंदे,निलेश जाधव,शाम गित्ते,दत्ता लोखंडे ,ऐराज खान व इतर भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीचे डोहाळे
पाणीपुरवठा योजना,भुयारी गटारी योजनेचे काम सध्या परळी शहरात युद्ध पातळीवर सुरु आहेत. नगरोत्थान योजनेतील रस्त्यावरील खड्डे नव्हेत तर ते दुभाजक आहेत या दुभाजकावरील गेल्या तीन दिवसांपासून कामे सुरु केली आहेत आणि लवकरच पूर्ण होतील. परळीचा कधीही कळवळा न येणाऱ्या भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन म्हणजे निवडणुकीचे डोहाळे असल्याची टीका बांधकाम सभापती अन्नपूर्णा शंकरराव आडेपवार यांनी केली आहे.
===Photopath===
280621\img-20210628-wa0393_14.jpg