लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : नगर-बीड या राष्ट्रीय महामार्गावर अनेक महिन्यापासून रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता, हेच कळत नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील तरुणांनी खड्ड्यांना फूल, हळदी-कुंकू वाहून त्यात बेशरमाची झाडे लावून गांधीगिरी केली.
आष्टी तालुक्यातून गेलेला बीड-नगर राष्ट्रीय महामार्ग आहे. याचे काम पूर्ण होत आले आहे. असे असले तरी कामाला मंजुरी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. आष्टी, कडा, साबलखेड हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नसल्याने दररोज आठ, दहा अपघात होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा बोलून फक्त आश्वासन दिले जाते. अखेर कडा शहरातील तरुण दीपक गरुड, किशोर घोडके, गंगा खेडकर, राजेंद्र म्हस्के, सिद्धीक सय्यद, संभाजी शिंदे, दिलीप लोंखडे यांच्यासह अनेकांनी त्या खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून शुक्रवारी अनोख्या पद्धतीने गांधीगिरी केली.
100921\nitin kmble_img-20210910-wa0048_14.jpg
खड्ड्यात बेशरम लावून तरुणांची गांधीगीरी