शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

दागिने लुटणारी महिलांची टोळी माजलगावात गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:52 PM

बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिनले लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई माजलगाव शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी माजलगाव बसस्थानकात केली.

ठळक मुद्देबीड शहर पोलिसांची कामगिरी : हमाल बनून सावज शोधणाराही जेरबंद

बीड : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिनले लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई माजलगाव शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी माजलगाव बसस्थानकात केली. या टोळीत चार महिलांसह एका पुरूषाचा समावेश आहे. या कारवाईने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.सोयाबीन हरिभाऊ भोसले (१९ रा. सावरगाव), सुभाष सोमाजी उमाप (४५ रा. ब्रम्हगाव), धूपता परमेश्वर जाधव (५० रा.गांधीनगर, बीड), शोभा संजय भालेराव (४० रा.रमाई चौक, बीड), मंगल सतीश तुसाबर (४२ रा. बलभीमनगर, बीड) अशी पकडलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.सादोळा येथील माधुरी सोळंके या बीडला माहेरी जाण्यासाठी माजलगाव बसस्थानकात आल्या. बराचवेळ थांबूनही बस आली नाही. दुपारी ३ वाजता बस येताच तिच्यात बसण्यासाठी एकच गर्दी झाली. हीच संधी साधून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठल चोरट्यांनी लंपास केले. बसमध्ये बसल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान, पोउपनि एस.एस.बिराजदार यांनी स्थानकात धाव घेत कॅमेरे तपासले. यावेळी त्यांना काही महिलांवर संशय आला. सायंकाळी ५ वाजता त्यांनी सोयाबीन आणि सुभाषला ताब्यात घेतले. पोलीस हिसका दाखविताच त्यांनी इतर साथीदारांची नावे सांगितले. त्यानंतर रविवारी रात्रीच माजलगाव पोलीस बीडमध्ये आले. त्यांनी आणखी ३ महिलांना ताब्यात घेतले. सोमवारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, पोनि सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि एस.एस.बिराजदार, सहायक फौजदार सुंदर पवार, पोना किशोर राऊत, श्रीमंत पवार, संजिवणी सोन्नर आदींनी केली.सुभाष हा बसस्थानकातच हमाली करतो. महिलांच्या गळ्यातील दागिने, पोलीस आहेत का? या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन या महिला चोरट्यांना देतो.त्यानंतर या महिला संधी साधून धक्काबुक्की आणि गर्दी करीत महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करतात. तर शोभा ही कुख्यात गुन्हेगार गझनीचीआई आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसArrestअटक