लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : गेवराई ठाण्याच्या हाद्दीतून हैदराबाद येथून औरंगाबादकडे जाताना एक टेम्पो अडविला. यातून २९ लाख ६५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुटखा नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आली.२९ आॅगस्ट रोजी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने पहाटेच्या सुमारास बीड-गेवराई मार्गावर एक टेम्पो पकडला होता. यामध्ये तब्बल २९ लाख ६५ हजार रूपयांचा गुटखा आढळून आला होता. पोलिसांनी टेम्पोसह गुटखा असा १५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी गेवराई शहरातील शासकिय आयटीआयच्या मागे हा गुटखा जाळून नष्ट करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, मुक्तार शेख, नारायण खटाने, आईटवार, शरद बहिरवाळ, भारत देशमुख, कावळे, प्रताप खरात आदी उपस्थित होते.
गेवराईत २९ लाखांचा गुटखा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:21 AM
गेवराई ठाण्याच्या हाद्दीतून हैदराबाद येथून औरंगाबादकडे जाताना एक टेम्पो अडविला. यातून २९ लाख ६५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता.
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची कारवाई