गेवराई : शहरात गेवराई पोलिसांनी अचानक कोंबींग आॅपरेशन राबवून साखर झोपेत असणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या घरावर गुरुवारी पहाटे छापा टाकला. यात कुकरी व तलवार जप्त केली.सचिन दिगांबर दाभाडे (रा.दाभाडे गल्ली गेवराई) व नितीन भास्कर पोपळघट (रा.लोहार गल्ली, गेवराई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गुरूवारी गेवराई पोलिसांनी अचानक कोंबींग आॅपरेशन राबविले. यामध्ये खुद्द उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जून भोसले, पोउपनिरीक्षक भूषण सोनार, अरविंद गटकुळ आदींनी सहभाग नोंदविला. विशेष पथके तयार केली. त्याप्रमाणे पोपळघट व दाभाडे यांच्या घरी अचानक छापे टाकले. दोघांच्याही घरातून स्टीलची कुकरी आणि एक तलवार जप्त केली. त्यांच्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.सव्वा किलो गांजा जप्तगेवराई शहरातीलच चिंतेश्वर गल्लीतील मोईन अमानउल्ला खान याच्या घरी छापा टाकून सव्वा किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
गेवराईत कुकरी, तलवार जप्त; दोन अट्टल गुन्हेगार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:00 AM
शहरात गेवराई पोलिसांनी अचानक कोंबींग आॅपरेशन राबवून साखर झोपेत असणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या घरावर गुरुवारी पहाटे छापा टाकला. यात कुकरी व तलवार जप्त केली.
ठळक मुद्देकोम्बिंग आॅपरेशन : साखरझोपेतच घरावर टाकला छापा