बीड : नुतन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर डॉ. आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी गेवराईमध्ये अचानक टँकर तपासणी सुरु केल्यानंतर टँकर माफियासह महसूल आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांमध्ये धावाधाव सुरु झाली. पाणीपुरवठ्यात होणारी अनियमितता या तपासणीत समोर आल्याने या बाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात आले.सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने होणाºया कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नियोजन तसेच कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी गेवराईत आले होते. बैठकांसह इतर कामकाज आटोपल्यानंतर ते बीडकडे रवाना होताना त्यांनी अचानक आपले वाहन रस्त्यालगत लावून उभ्या असलेल्या टँकरची तपासणी सुरु केली. अनेक टँकरवर स्वत: चढून त्यांनी तपासणी सुरु केली. नवे जिल्हाधिकारी स्वत: तपासणी करत असल्याने लोकांनीही कुतुहलाने गर्दी केली. अनेकांनी मोबाईलवर फोटोही काढले. सोशल मिडीयावर हे फोटो काही क्षणांत व्हायरल होताच महसूलसह इतर यंत्रणेची धावपळ उडाली.बीड जिल्ह्यात यंदा पाऊसप्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यात मार्चमध्येच ३८५ गाव, १५३ वाड्यांमध्ये ४७० टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टॅँकरसाठी व टॅँकर व्यतिरिक्त एकूण ६०२ विहीर, बोअरचे अधिग्रहण केले आहे.मागील तीन आठवड्यात विविध कारणांमुळे टॅँकरची तपासणी करण्यात प्रशसकीय यंत्रणा ढिली पडली होती. टॅँकरने पाणी पुरवठ्यासाठी शासनाच्या नियमावलीनुसार अनुपालन होते की नाही, असे चित्र होते. स्थानिक यंत्रणेचे दुर्लक्ष होत गेले.गेवराई तालुक्यात बनावट फेºया दाखवून गैरप्रकार होत असल्याच्या लेखी तक्र ारी अनेक ग्रामपंचायतींनी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक टॅँकरची तपासणी केली. टॅँकर चालकांना विचारणादेखील केली. या तपासणीत अनेक त्रुटी तसेच अनियमितता आढळल्या. स्थानिक यंत्रणेच्या अहवालानंतर होणाºया कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.साफ दुर्लक्षलॉगबुक, जीपीएस प्रणालीचा वापर, टॅँकर फेºयांच्या नोंदवहीत सरपंच व पंचाच्या स्वाक्षºया, टॅँकर सुरु करण्याचे आदेश यासह आरटीओच्या वहनक्षमतेनुसार पाणी पुरवठा योग्यरित्या होतो का? या बाबींचे निरक्षण करण्याची गरज असताना साफ दुर्लक्ष झाले होते.तक्रार करण्याचे ग्रामस्थांना आवाहनगावामध्ये टँकर सुरु असल्यास किती फेºया मंजूर आहेत याची माहिती घेऊन तेवढ्या फेºया होतात का ? हे पहावे. तसेच असे होत नसल्यास संबंधित कार्यालयाकडे तक्रार करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून गेवराईत तपासणी; टँकरमाफिया हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:52 PM
नुतन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर डॉ. आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी गेवराईमध्ये अचानक टँकर तपासणी सुरु केल्यानंतर टँकर माफियासह महसूल आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांमध्ये धावाधाव सुरु झाली.
ठळक मुद्देअनियमितता आढळली : गेवराईची बैठक आटोपून बीडकडे येताना उतरले रस्त्यावर