शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

नवीन औष्णिक केंद्रातून क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 12:51 AM

नवीन औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत.

परळी (जि. बीड) : येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्राने दोन दिवसांपूर्वीच तिन्ही संचातून क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती करून उच्चांक गाठला. शंभर टक्केपेक्षा जास्त वीजनिर्मिती करण्याची नवीन औष्णिक विद्युत केंद्राच्या उभारणीनंतर ही पहिलीच वेळ आहे. एकूण ७५० मेगावॅट क्षमतेच्या तिन्हीही संचातून ३० नोव्हेंबर रोजी एकूण ७६६ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती झाली, ती १०२ टक्के ग्राह्य धरली गेली.नवीन औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. यामध्ये संच क्र मांक ६, संच क्र मांक ७ व संच क्र मांक ८ हे तीन संच आहेत. ३० नोव्हेंबर रोजी संच क्र मांक ६ मधून २५६ मेगावॅट, ७ मधून २५६ मेगावॅट व ८ मधून २५४ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती झाली. क्षमतेपेक्षा जास्त वीज निर्मिती तिन्ही संचांतून झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळसा परळी विद्युत केंद्रात एक लाख मे. टन उपलब्ध आहे व कोळशाची आवक सुरू आहे. त्यामुळे कोळशाचा तुटवडा भासत नाही व खडका धरणात पाणी साठा मुबलक आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने बंद असणारे संच आता मात्र सुरळीत चालू आहेत, अशी स्थिती असताना १ डिसेंबर रोजी मात्र संच क्र मांक ७ हा बंद ठेवण्यात आला. संच क्रमांक ७ मंगळवारी कार्यान्वित होईल, असे उपमुख्य अभियंता के. एम. राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीड