गेवराई : कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्व प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याच अनुषंगाने सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पोलीस, महसूल व नगर परिषदेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. तब्बल ५९ जणांवर कारवाई करत ११ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले असून, याची अंमलबजावणी जोरात सुरू केली आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी पोलीस, महसूल, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका चालविला. शहरात विनामास्क फिरणाऱ्या ५९ नागरिकांना ११ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले, तलाठी गजानन देशमुख, तलाठी बाळासाहेब पखाले, पोलीस एकनाथ कावळेंसह नगर परिषद व महसूलचे अनेकजण उपस्थित होते. या संयुक्त कारवाईमुळे नागरिकांना दंड बसत असल्याने शहरात मास्क घालणे सुरू झाले आहे.
===Photopath===
060421\20210406_105732_14.jpg