गेवराई : शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असून, रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. यासाठी लॉकडाऊन, मास्क, सोशल डिस्टन्स आवश्यक आहे. तसेच लसीकरणसुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंध लस घेण्यासंदर्भात गुरुवारी येथील नगर परिषद हाॅलमध्ये बैठक झाली. नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या उपस्थितीत व्यापारी, तसेच फळे, भाजी विक्रेते व अन्य व्यावसायिक, नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यावेळी व्यापारी बांधवांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासंदर्भात वेळापत्रक तयार करण्यात आले. कोणताही संभ्रम न बाळगता नागरिकांनी, तसेच व्यापारी बांधवांनी लसीकरण करून घ्यावे व इतरांनाही लस घेण्यास तयार करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत वारनिहाय लसीकरणाचे वेळापत्रक तयार करण्यात आले. यावेळी शहरातील प्रत्येक व्यापारी संघटनेचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीला उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, व्यापारी संघटनेचे प्रताप खरात, सुरेश बरगे, सुरेद्र रूकर, कृष्णा काकडे, धोडलकर, राम पवारसह शहरातील नगरसेवक, विविध व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.
===Photopath===
080421\sakharam shinde_img-20210408-wa0021_14.jpg