सखाराम शिंदे
गेवराई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ऑक्सिजनच्या अतिरिक्त बेडसह विविध साहित्य तयारी करून ठेवले असून येथील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी लोकमतला दिली. तालुक्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. यात उपजिल्हा रुग्णालय व शारदा कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचे ८० बेड उपलब्ध होते. तसेच येथील नगर परिषद शाॅपिंग सेंटर, कस्तुरबा गांधी विद्यालय, भगवती चित्रमंदिर, र.भ. अट्टल महाविद्यालय, दारू ऊलुम येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यामुळे खाटांची कमतरता भासली नाही. आता कोरोनाच्या तिस-या लाटेच्या शक्यतेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून खाटा, ऑक्सिजन खाटा कमी पडू नयेत म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी यंत्रणा सज्ज केली आहे. यात गरज भासल्यास पूर्वीप्रमाणे सर्व कोविड सेंटर सुरू करण्यात येतील. तसेच पूर्वी उपजिल्हा रुग्णालय ६० व शारदा कोविड सेंटरमध्ये २० अशा ८० ऑक्सिजन खाटा उपलब्ध होत्या. यात वाढ करून शहरातील नगर परिषदेच्या शाॅपिंग सेंटरमध्ये नवीन ७० ऑक्सिजन बेड तयार केले आहेत. ई.सी.जी. मशिन, बायपॅप मशिन उपलब्ध आहेत.तसेच पूर्वीचे मोठाले १२९ ऑक्सिजन सिलिंडर, ३० लहान सिलिंडर उपलब्ध आहेत. तर, नवीन ५० खाटांसाठी तसेच इतर औषधांसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे यांनी लोकमतला दिली.
( चौकट )
गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकसहभागातून आणलेल्या दोन ड्युरा लिक्विड मेडिकल सिलिंडरमुळे अनेक खाटांना ऑक्सिजन पुरवणार आहे. जिल्ह्यात कोठेच नाही असे हे दोन ड्युरा सिलिंडर नव्याने बसवले आहेत. तसेच ऑक्सिजन प्लान्टला म॔ंजुरी मिळाली. मात्र, अजून काम सुरू झालेले नाही.
130821\13bed_2_13082021_14.jpg