१ लाख ९६ हजाराचे चांदीचे दागिने लंपास
गेवराई : शहरातील मध्यवस्तीत लोहार गल्ली येथील बाजार पेठेतील सराफा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ३ किलो चांदीचे दागिने असा १ लाख ९६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार मध्यरात्री २ च्या सुमारास घडली.
शहरातील मध्यवस्तीत लोहार गल्ली येथे कृष्णा राजेंद्र पंडित यांचे साई ज्वेलर्स नामक दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास या दुकानाच्या शटरचे कुलूप असलेल्या जागेची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानात ठेवलेले ३ किलो चांदीचे दागिने चारून नेले. याची अंदाजे किमंत १ राख ९६ हजार रुपये सांगण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक पुरूष्तोम चोबे,सपोनि संदिप काळे सह अनेकांनी पहाणी करून पंचनामा केला आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. ही घटना घडल्याने येथील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार
पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे फरार झाले. तर शहरात बसवलेल्या सी.सी.टीव्ही कॅमेरात अज्ञात तीन चोरटे कैद झाले असून त्यांच्या तोडांला बांधलेले आहे.या चोरी प्रकरणी तपास चालू असल्याचे सपोनि संदीप काळे यांनी सांगितले.