शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

साडेचार हजार पशुधनाला मिळाले ‘राहत’मुळे जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:24 AM

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जनावरं सांभाळणे कठीण झाले होते.

ठळक मुद्देजेवणाची व्यवस्था । १३ ते १४ गावांतील शेतकऱ्यांनी घेतला राहत शिबिरात आश्रय

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जनावरं सांभाळणे कठीण झाले होते. अनेक पशुपालक शेतकºयांनी कवडीमोल भावाने आपली जनावरे बाजारात विकली. त्यानंतर शासनाच्या वतीने गोशाळेच्या माध्यमातून बीड तालुक्यातील पालवन येथे ‘राहत’ शिबीर सुरु करण्यात आले. शिबिरामुळे १३ ते १४ गावांमधील साडेचार हजार जनावरांना जीवदान मिळाले आहे.बीड शहराच्या आसपास बहूतांश गावांमधील शेती ही खडकाळ आहे. त्यामुळे पिकांपेक्षा शहर जवळ असल्यामुळे शेतकºयांमधून दुग्ध व्यवसायाला पसंती दिली जाते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चारा-पाण्याची टंचाई जाणवत होती. अनेक शेतकºयांना पशुधन कसे टिकवायचे, हा प्रश्न पडला होता. तसेच छावण्या सुरु करण्याचा शासनाचा निर्णय झालेला नव्हता. मात्र, पालवन परिसरातील राजेंद्र मस्के यांच्या गोशाळेच्या माध्यमातून ‘राहत’ शिबिराला मान्यता मिळाली व ते सुरु झाले. परिसरातील शेतकरी आपल्या बिºहाडासह या शिबिरावर राहायला आले. या राहत शिबिरामुळे पशुधन वाचल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.शेतकºयांसाठी जेवणबीड शहराच्या परिसरातील १३ ते १४ गावांमधील शेतकरी या राहत शिबिरात सहभागी झाले आहेत. अनेक जण मागील चार महिन्यापासून आपल्या कुटुंबासोबत तर काही जण जनावरांची देखरेख करण्यासाठी एक जण राहत शिबिरावर वास्तव्यास असतो. त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नसल्याचे दिसून आल्यानंतर राहत शिबिरावरच जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय राहत शिबिराचे चालक राजेंद्र मस्के यांनी घेतला आहे.लसीकरणामुळे साथीचे रोग नाहीतएकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जनावरे एकत्र आल्यानंतर साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते मात्र, त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी लसीकरण केले जात आहे. त्यामुळे जनारवांचे स्वास्थ चांगले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे यांनी दिली.गांडूळ खत निर्मितीचा प्रयोगराहत शिबिरावर पडलेल्या शेणावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती करण्यात येत आहे. या माध्यमातून उत्पादन कसे घ्यावे याचे प्रशिक्षण देखील राहत शिबिरावर शेतकºयांना दिले जात आहे. त्यामुळे शेतकºयांना दुग्ध व्यवसायासोबतच इतर पुरक व्यवसायातून आपली प्रगती साधता येणार आहे.रोज लागतो ८५ टन चारासाडेचार हजारांपेक्षा अधिक जनावरे असलेल्या राहत शिबिरात रोज ८५ टन चारा वाटप केला जातो. तसेच इतर राज्यातून मुर घास आणला असून त्याचे देखील वाटप केले जाते. तसेच जनावरांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक शेतकºयांसाठी पाण्याची व्यवस्था त्यांच्या जवळ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रोज सकाळी व संध्याकाळी येथील शेतकरी बीड शहरात दुधाची विक्री करतात. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळत असल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र