शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गर्भातच खुडल्या कळ्या; आरोग्य मंत्र्यांच्या धाराशिवसह २२ जिल्ह्यांतील लिंग गुणाेत्तर घटले

By सोमनाथ खताळ | Updated: March 13, 2024 18:40 IST

गर्भलिंग निदान व गर्भपात रोखण्यात अपयश : पुणे उपसंचालकांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र

बीड : राज्यात गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. कडक कायदे करूनही हा बाजार बंद करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथील राज्य कुटुंब कार्यालयाच्या पत्रानुसार राज्यातील २२ जिल्ह्यांतील लिंग गुणोत्तर घटले आहे. यामध्ये आजी-माजी आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. २०१९ सोबत २०२२ ची तुलना करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून आजही गर्भातच कळ्या खुडल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात करणे हे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ कायदाही आहे; परंतु याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानेच गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्याचा संशय उपसंचालकांनी व्यक्त केला आहे. याचाच आढावा अतिरिक्त संचालकांनी २९ जानेवारी २०२४ रोजी घेतला. यामध्ये २२ जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर घटल्याचे उघड झाले आहे. याच अनुषंगाने उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांनी २२ जिल्ह्यांच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र काढून गांभीर्याने घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या प्रकाराने राज्यातील गर्भलिंग निदान व गर्भपाताबाबत कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. याबाबत उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांना संपर्क केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही.

बीडसह आठ जिल्ह्यांत समाधानकारकसर्वांत आगोदर बीड जिल्ह्यातील परळीमध्ये डॉ. सुदाम मुंडे याने गर्भातच कळ्या खुडल्याचे उघड झाले होते. यामध्ये त्याला शिक्षाही झाली होती; परंतु २०२३ मध्ये बीडचे लिंग गुणोत्तर हे हजार मुलांमागे ९३४ एवढे होते. यासोबतच राज्यातील इतर आठ जिल्ह्यांमध्येही लिंग गुणोत्तर समाधानकारक असल्याचे समोर आले आहे.

जालन्याची आकडेवारी चिंताजनकराज्यात सर्वांत जास्त लिंग गुणोत्तर हे जालना जिल्ह्यात घटले आहे. २०१९ मध्ये या जिल्ह्यात १०२२ एवढे होते. तेच आता २०२२ मध्ये कमी होऊन ८५४ वर आले आहे. तब्बल १६८ ने या जिल्ह्यात घट झाली आहे. त्यानंतर अकोल, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

काय आहेत कारणे?बीड जिल्ह्यात २०२२ मध्ये अवैध गर्भपात, तर २०२४ मध्ये अवैध गर्भलिंग निदानाचे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. यात केवळ मुलगी नको, हेच मुख्य कारण राहिलेले आहे. पहिली मुलगी झाल्यानंतर वंशाला दिवा हवा म्हणून दुसरा मुलगा पाहिजे, याच भावनेतून त्यांनी गर्भलिंग निदान केल्याचे स्पष्ट झालेले आहे.

जिल्हा २०१९ २०२2 फरकसिंधुदुर्ग ९६१ ९५० - ११लातूर ९३० ९१८ - १२सोलापूर ९२३ ९११ - १२नाशिक ९१० ८९७ - १३गडचिरोली ९५४ ९४० -१४अहमदनगर ८९३ ८७९ - १४नागपूर ९४२ ९२३ - १९धुळे ९०३ ८८३ - २०परभणी ९३० ९१० - २०अमारवती ९५२ ९३० - २२औरंगाबाद ९०९ ८८६ - २३रायगड ९५५ ९२४ - ३१यवतमाळ ९३२ ८९३ - ३९उस्मानाबाद ९१३ ८७४ - ३९भंडारा ९४५ ९०५ - ४०रत्नागिरी ९५३ ९११ - ४२गोंदिया ९८९ ९४७ - ४२नंदुरबार ९६३ ९१६ - ४७सांगली ९०६ ८५७ - ४९नांदेड ९५६ ९०७ - ४९अकोला ९५२ ९०२ - ५०जालना १०२२ ८५४ - १६८

टॅग्स :BeedबीडAurangabadऔरंगाबादAbortionगर्भपात