शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

छेडछाडीला कंटाळून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात मृत्यूशी देत आहे झुंज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 4:06 PM

बीड तालुक्यातील अंथरवन पिंपरीतील घटना

बीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथील एका १७ वर्षीय मुलीला गावातीलच तरूण छेडत होता. याच छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी द्रव प्राशन केले. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली. सध्या तिच्यावर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. मुलीच्या वडिलांनी सदरील तरूणाविरोधात जबाब दिला आहे.

अंथरवण पिंप्री येथील एका ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलीची  गावातीलच एक तरुण सतत पाठलाग करुन छेड काढत असे. मुलीचे आई- वडील ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते. दहा दिवसांपूर्वीच ते गावी परतले आहेत. ३ एप्रिल रोजी सकाळी शौचासाठी म्हणून गेलेली मुलगी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला तेव्हा घराजवळीलच एका शेतात ती अत्यवस्थ स्थितीत आढळली. तिने विषारी द्रव प्राशन केल्याचे निदर्शनास आल्यावर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.  मुलीच्या वडिलांनी रुग्णालय चौकीत तरुणाविरुध्द जवाब दिला असून उशिरापर्यंत पिंपळनेर ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीBeedबीड