शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

मेगा नोकर भरतीत ब्राह्मण समाजाला आरक्षण द्या; केजमध्ये सकल ब्राह्मण समाजाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 7:38 PM

मेगा भरतीमध्ये राज्यातील सकल ब्राम्हण समाजाला दहा टक्के राखीव कोटा ठेवावा अशी मागणी करण्यात आली.

केज (बीड ) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या मेगा भरतीमध्ये राज्यातील सकल ब्राम्हण समाजाला दहा टक्के राखीव कोटा ठेवावा अशी मागणी सकल ब्राम्हण समाजाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे एक निवेदन आज  केज येथील सकळ ब्राम्हण समाजाने तहसीलदारांना सादर केले. 

सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील ब्राह्मण समाज शासनाच्या कोणत्याही आरक्षण प्रवर्गात मोडत नाही तसेच समाजास कोणत्याही शासकीय सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. ब्राम्हण समाज हा पुरोगामी महाराष्ट्राचा घटक असुन सातत्याने शासनासाला सहकार्याची भावना ठेवणारा व शिस्तप्रिय समाज आहे. समाजाने आजतागायत कधीही कायदा मोडला नाही किंवा शासनाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवलेली नव्हती , ब्राह्मण समाजाचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र आरक्षित जागे नंतरही सर्व समाज खुल्या जागेतून भरती होत असल्याने गुणवत्ता असतानाही ब्राह्मण समाजातील युवकांना नौकरी मिळत नाही. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या मेगा भरती मध्ये राज्यातील सकल ब्राम्हण समाजाला दहा टक्के कोटा ठेवण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

या बाबतचे निवेदन शुक्रवारी केजचे नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्याकडे केज येथील सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने देण्यात आले या निवेदनावर सकल ब्राह्मण समाजाचे धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर , श्रीराम शेटे , श्रीधर खोत , शिवराज मुथळे, राहुल औसेकर, अभिजीत शेटे, सुरज पैठणकर, व्यंकटेश महाजन,जयंत देशपांडे , सुमीत पत्की आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. 

टॅग्स :agitationआंदोलनBeedबीडTahasildarतहसीलदारreservationआरक्षण