बीड : हैदराबादहुन परतल्यावर क्वारंटाईन केले. तरीही लग्नात व बँकेत हजेरी लावली. तसेच ही माहितीही आरोग्य विभागापासून लपवली. हाच प्रकार बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसह इतर तिघांना अंगलट आला आहे. याप्रकरणी बाधितांसह सात जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहरातील झमझम कॉलनी व मसरत नगर भागातील चौघे 27 मे रोजी हैद्राबाद ला गेले. परत आल्यावर त्या सर्वांना क्वारंटाईन केले होते. तरीही त्यातील काही लोक बाहेर पडले आणि सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. शासकीय कार्यालय, बँक आदी ठिकाणी त्यांचा वावर झाल्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधून उघड झाले. त्यांच्या या बेशिस्तपणामुळे इतरांचे आरोग्य धोक्यात आले. त्यांच्या संपर्कातील इतरांनाही कोरोनाची बाधा झाली. तसेच त्यांनी आरोग्य सेतू अप वर ही माहिती भरली नाही. बाधित आढळल्यानंतरही माहिती दडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोग्य विभागाला संपर्कातील लोकांचा शोध घेताना अडचणी आल्या. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने याचा सविस्तर अहवाल तयार केला. त्यावरून 7 जणांवर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंडळ अधिकारी परमेश्वर राख यांनी याबद्दल फिर्याद दिली आहे.
सोशल मीडियावर बदनामीबीड शहरातील इस्लामपुरा भागातील एक मुलाने कसलीही खात्री न करता सोशल मीडियावर पोस्ट टाकून आरोग्य विभागाची बदनामी केली. तसेच वाहिनी संशयित रुग्णांचे स्वॅब घेताना आरोग्य कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व फोटो काढून व्हायरल केले. म्हणून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.