आष्टी : शहरातील सायकड गल्लीत सोमवारी पहाटे चोरीची घटना होत नाही तोच भर दुपारी चोरट्यांनी पंचायत समिती समोरील भागात डाव साधला. दोन्ही घटनेत नगदी व रोख मिळून जवळपास साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे.
शहरातील मुर्शदपूर भागातील प्रा.नवनाथ विधाते यांच्या घरातील सर्व सदस्य सोमवारी त्यांच्या मुळ गावी नांदूर विठ्ठलाचे येथे गेले होते. दुपारी पावणे दोनच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून घर फोडले. घरातील रोख रक्कम एक लाख ४० हजार रूपये व एक तोळा सोन्याची चेन चोरली. वृत्त लिहीपर्यंत आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तर सोमवारी पहाटेच शहरातील सायकड गल्ली येथे राहणारे आर.सी.खुळपे नामक शिक्षकाच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घराचे कुलूप तोडून प्रवेश करीत जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनास्थळांची पाहणी करून पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पो.ना.मच्छिंद्र उबाळे,अमोल ढवळे यांनी पंचनामा केला.
===Photopath===
150321\img-20210315-wa0343_14.jpg~150321\img-20210315-wa0390_14.jpg
===Caption===
आष्टी शहरात सोमवारी घरफोडीचे दोन गुन्हे घडले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.