शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

आनंदवार्ता ! माजलगाव धरण ५० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 6:30 PM

सरासरी पावसाच्या तुलनेत दिड महिन्यात ६५ टक्के पाऊस

ठळक मुद्देधरण परिसरात  मागील आठवड्यात चांगल्या पावसाची नोंद

माजलगाव : माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात  मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसाची नोंद झाली असुन पावसाच्या सरासरीच्या तुलनेत  केवळ दिड महिन्यात ६५  टक्के ऐवढा पाऊस झाला असल्याने धरणाच्यापाणी पातळीतही मोठयाप्रमाणावर वाढ झाली असुन शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता ४७. ३७ टक्के पाणी पातळी झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे .

मान्सुनपुर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणात २ टक्के पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यानंतर वेळोवेळी दमदार पाऊस पडत राहिल्याने मागील दिड महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ६५ टक्के पाऊस पडला आहे. माजलगाव तालुक्याची पावसाची सरासरी ही ७०६ मी.मी.असुन यावर्षी २३ जुलै पर्यंत तालुक्यात ४२७.७० मी.मी.पावसाची नोंद झाली होती.

माजलगाव धरणात २ जून रोजी ४२७. ६८ मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात २०४. ५ दलघमी ऐवढा एकुन पाणी साठा होता तर ६२. ०० दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता व १९.८७ टक्के पाणी होते. २४ जुलै रोजी  दुपारी १ वाजता या धरणात ४२९.३८ मीटर ऐवढी पाणी पातळी असुन २८९.८० दलघमी ऐवढा पाणीसाठा असुन त्यातील उपयुक्त पाणी साठा हा १४७.८० दलघमी ऐवढा झाला असुन धरणात १७ हजार ६५७ क्युसेसने पाण्याची आवक सुरू होती . आता धरण भरण्यासाठी केवळ २. ४२ मीटर ऐवढया पाण्याची आवश्यकता आहे. धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे .

गेल्यावर्षी परतीच्या पावसाने भरले होते धरणगेल्यावर्षी माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. पाणी पातळी जोत्याखाली गेल्याने व पावसाळा संपत आला तरी धरणाची पाणी पातळीत जास्त प्रमाणात वाढ न झाल्यामुळे धरणाची पाणीपातळी     जोत्या खालीच राहते की काय ? असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने केवळ चार दिवसात हे धरण टक्केवारीत येऊन पूर्णपणे भरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कालवा व नदी द्वारे अनेक वेळा पाणी सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी धरण भरल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीDamधरण