- सोमनाथ खताळबीड : जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाºया चौघांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात पाटोदा शहरातील एक व तालुक्यातील कारेगाव येथील तिघांचा समावेश आहे. आता पाटोदा शहरात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. तर जिल्ह्यात आतापर्यंत ५७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ६९ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी एकाचा मृत्यू झालेला आहे तर ५७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या बीड जिल्ह्यात १० व औरंगाबादेत एक अशा ११ जणांवर उपचार सुरू आहेत. रविवारी पाटोदा शहरातील एक व तालुक्यातील कारेगाव येथील एकाच कुटूंबातील तिघे कोरोनामुक्त होऊन घरी परतले. पाटोदा शहरातील तीनही रुग्ण बरे झाल्याने शहर कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्यात आता केवळ डोमरी व कारेगाव येथील एक असे दोघे उपचार घेत आहेत.
दरम्यान, या आगोदरच आष्टी, शिरूर, केज, वडवणी, माजलगाव हे तालुके कोरोनामुक्त झालेले आहेत. या तालुक्यांमध्ये सध्या एकही रुग्ण नाही. अंबाजोगाई तालुक्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या टिम योग्य परिश्रम आणि रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
आज ७६ अहवालांची प्रतिक्षाकोरोना संशयित असलेल्या ७६ जणांचे रविवारी नव्याने स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले होते. यात बीडमधील १५, अंबाजोगाई ३१, केज २, आष्टी २ व परळी येथील ८ स्वॅबचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत याचे अहवाल येतील, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.