बाळासाहेब खंडागळे यांचे सहकारी अशोक मोटे यांच्या पाहुण्यांनी माजलगाव येथून किराणा खरेदी केला होता. परंतु नगदी पैसे जवळ नसल्याने त्यांनी मित्र दादासाहेब खंडागळे यांना फोन करून दुकानदाराचा गुगल पे अकाऊंट नंबर देऊन पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार ३००० रुपये किराणा व्यापारी समीर बागवान यांना पाठवण्यात आले. त्यानंतर १३ मे रोजी नजरचुकीने बागवान यांच्याकडून आंब्याच्या व्यापाऱ्याला २३ हजार रुपये पाठवण्याऐवजी ते खंडागळे यांना गुगल पेवर पाठविण्यात आले. हे लक्षात येताच बागवान यांनी खंडागळे यांना संपर्क साधत पैसे परत करण्याची विनंती केली. खंडागळे यांनीही तत्काळ गुगल पेवर बॅलेन्स तपासला. तेव्हा २३ हजार रुपये आल्याचे दिसून आले. त्यानंतर माणुसकी दाखवत खंडागळे यांनी माजलगाव येथील व्यापाऱ्याला ती रक्कम लगेच परत पाठवली. व्यापारी बागवान यांनी त्यांचे आभार मानले.
गुगल पेवर नजरचुकीने आलेले २३ हजार रुपये केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:32 AM