बीड : आतापर्यंत गोपीनाथरावांसाठी शिवसेनाप्रमुख एक एक जागा सोडत होते, आता मात्र बीड जिल्हा भगवामय झालेला पाहिजे, प्रत्येक गाव तेथे शाखा, बोर्ड, भगवा झेंडा पाहिजे. पुन्हा झंझावात पहायचा आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच असा दावा करतानाच तुम्ही आमदार किती देणार? (श्रोत्यांमधून उत्तर ‘सहा’ आले) तुम्ही आमदार दिले तर हे शक्य असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील लोकसभेसह विधानसभेच्या सहा जागांवर शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याबाबत शिक्कामोर्तब केले.बीड येथे शिवसेनेच्या गटप्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारवर आसूड ओढले. व्यासपीठावर मराठवाडा संपर्क नेते खा. चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मिलींद नार्वेकर, खा. संजय जाधव, मनिषा कायंदे, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक आदी उपस्थित होते. इकडे तुमचे सरकार, केंद्रातही तुमचे सरकार. पण भ्रमनिरास केला. यावेळी शिवसेनेचे मराठवाडा संपर्क नेते खा. चंद्रकांत खैरे शिवसेनेने विधानसभेच्या मराठवाड्यातील ४६ पैकी ४० जागांवर लक्ष केंद्रित केले असून बीड जिल्ह्यातील सहा जागांचा यात समावेश आहे. सत्ता असेलतर पूर्ण निर्णय घेऊ शकतो. गटप्रमुखांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन संपर्क करावा असे आवाहन यांनी केले. खैरे म्हणाले, मराठवाड्यावर अन्याय झाला आहे. २१ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. महाराष्टÑाचं सरकार फक्त शिवसेनेचेच असले पाहिजे, यासाठी संघटन मजबूत ठेवण्याचे आवाहन खैरे यांनी केले.हा जल्लोष निवडणुकीच्या मैदानातही दिसू द्याउद्धव ठाकरे भाषणासाठी माईकजवळ येताच दोन - तीन मिनिटे घोषणाबाजी झाली. सभागृहातला उत्साह पाहून माझाही उत्साह द्विगुणीत होतोय. हा जल्लोष सभागृहातला आहे. मैदानातही तो दिसला पाहिजे. मी चार्ज करायला आलो, पण हे पाहून चार्ज नव्हे, तुम्ही निवडणुकीची वाट बघताय हे दिसतंय, असे ठाकरे म्हणाले.मोकळ्या मनाचे राजकारणगोपीनाथजींची आठवण येते असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि मुंडेंच्या आठवणींना स्पर्श केला. २५ वर्ष मुंडेंबरोबर काम केले आहे. आम्ही कोरड्या मनाने राजकारण करत नाहीत, असे ठाकरे म्हणाले. पंतप्रधान परवा शिर्डीत आले. दुष्काळ निवारणासाठी केंद्र भरपूर मदत करील म्हणाले. पण त्यांनी थाप मारली असा टोला उद्धव ठाकरे यांनी लागवला.जाळं घट्ट झालं की, पहा कसा कालवा होतो. गट प्रमुखांनी घराघरात जावं, त्यांना बोला. सरकारच्या छापून आलेल्या जाहिराती दाखवा, अनुदान मिळाले का? कर्जमाफी झाली का? वीज कनेम्शन मिळालं का? विचारा त्याचे फलक लावा. गटप्रमुखांचं जाळं घट्ट झालं की, बघा कसा कालवा होतं ते पहा. गटप्रमुखाचं तळागाळात मजबूत आणि महत्वाचे काम करु शकेल. जनतेकडून खरं वदवून घ्या, खरे - खोटे झाले की सभा घ्यायची गरज पडणार नाही, असे ठाकरे म्हणाले.आणेवारी, अहवाल, मग केंद्राचं पथक येईल, यात किती दिवस जाणार? जनतेची विल्हेवाट लागेल. जनतेला देताना सरकार चर्चा करतंय आणि जीएसटी, नोटबंदी, पेट्रोल, डिझेलची भाववाढ थोपताना जनतेबद्दल कधी चर्चा केली का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला.दुष्काळावर सरकारची नुसती चर्चाकडूनिंबालाही कीड यांच्या कारकिर्दित लागली. पाणी, चाºयाचा पत्ता नाही. भीषण दुष्काळ असताना हे सरकार नुकसान भरपाई, आणेवारीवरच चर्चा करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मागायचे व दिल्लीत हमीभाव मागणाºया शेतकºयांवर काठ्या चालवायच्या, यांना शिवाजी महाराज कळलेच नाही, असेही ठाकरे म्हणाले.कॉँग्रेसला का दुखते?हिंदू आणि हिंदुत्वावर बोलण्याची कुणाची ताकद नव्हती तेव्हा ‘गर्व से कहा हम हिंदू है’ असा आवाज देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे धाडस होते. राम मंदिराचं काय झालं? न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पण राम मंदिरासाठी कायदा केला तर निर्णयाचा प्रश्नच येत नाही. पण काहीच मिळालं नाही. सरकार म्हणून धमक लागते. २५ नोव्हेंबरला मी अयोध्येला चाललो. हिंदू हृदय सम्राटांचा मी मुलगा हिंदुत्वावरच बोलणार मग कॉँग्रेसला का दुखते असा सवाल ठाकरे यांनी केला.
''गोपीनाथरावांसाठी जागा सोडत होतो, आता सर्व जागा लढणार''
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:12 AM
आतापर्यंत गोपीनाथरावांसाठी शिवसेनाप्रमुख एक एक जागा सोडत होते, आता मात्र बीड जिल्हा भगवामय झालेला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
ठळक मुद्देउद्धव ठाकरे : बीडमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल