बीड : सोलापूरमार्गे मांजरसुंब्याहून बीडकडे येणारा गुटख्याचा टेम्पो दरोडा प्रतिबंधक पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतला. यामध्ये जवळपास २५ लाख रुपयांचा गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. ही कारवाई गुरुवारी सकाळी करण्यात आली.बीड तालुक्यातील मांजरसुंबा मार्गे एक टेम्पो (एमएच २५ एजी ११९८) बीडकडे येत होता. याच दरम्यान दरोडा प्रतिबंधक पथक केज तालुक्यातील वडमाऊली दहीफळ येथील खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी जात होते. यावेळी पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव यांना खबऱ्यामार्फत टेम्पोतून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सदरील टेम्पोवर पाळत ठेवली. त्यांना काही हालचाली संशयास्पद आढळल्याने टेम्पोला मांजरसुंबा येथे अडवले. टेम्पोत पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याचे निदर्शनास आले. टेम्पो व चालकाला ताब्यात घेऊन नेकनूर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले. याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव, अशोक दुबाले, महेश भागवत, सौंदरमल, हजारे, चालक जायभाये यांनी केली.
२५ लाखांचा गुटखा घेऊन येणारा टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:36 PM
सोलापूरमार्गे मांजरसुंब्याहून बीडकडे येणारा गुटख्याचा टेम्पो दरोडा प्रतिबंधक पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतला.
ठळक मुद्देमांजरसुंब्याजवळ दरोडा प्रतिबंधक पथकाची कारवाई : सोलापूरहून येत होता गुटखा