अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षी निसर्गकृपेने तुरीचे बंपर उत्पादन झाल्याने अजुनही सरकारी गोदाम भरलेले आहेत. या तुरीची भरडाई करून राज्य सरकारने तूरडाळ विक्रीला काढली आहे. सुरुवातीला ५५ रुपये दराने विक्रीला काढलेल्या तूरडाळ खरेदीला अल्प प्रतिसाद मिळाल्याने अखेर सरकारी डाळीचे भाव २० रुपयांनी कमी करावे लागले आहेत. आता ३५ रुपये किलो प्रमाणे स्वस्त धान्य दुकानांवर ही डाळ मिळणार असल्याने सामान्य नागरिकांना खुल्या बाजाराच्या तुलनेत २५ रुपये किलोने तूर डाळ स्वस्त मिळणार आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील कृषी उत्पादनांवर विपरित परिणाम झाला होता. नंतर दोन वर्षात पाऊसमान चांगले राहिले. निसर्गाने साथ दिल्याने गतवर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने नाफेडमार्फत हमीदराने तूर खरेदी केली. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामात साठविली. ती बाहेर काढण्याआधीच चालू वर्षात हमीदराने खरेदी सुरु झाली.
त्यामुळे तूर साठविण्यास गोदाम अपुरे पडले. दरम्यान बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी केलेल्या तुरीची भरडाईनंतर तुरडाळीची स्वस्त धान्य दुकानातून विक्री करण्याचा शासनाने निर्णय घेतला. ही डाळ ५५ रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानांतून वितरित झाली. विक्रेते व शिधापत्रिकाधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. परिणामी तुरडाळीची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याच्या दृष्टीने स्वस्त धान्य विक्रेत्याला प्रति किलो ४ रुपये मार्जिन आणि विक्री भाव ३५ रुपये प्रती किलो असा निर्णय शासनाने ५ जून दरम्यान घेतला. याबाबत कार्यप्रणालीच्या सूचना व सुधारित निर्णय १४ जून रोजी जारी झाला. विक्रेत्यांकडून ३१ रुपये किलोप्रमाणे तुरडाळीची रक्कम जमा केली जाणार आहे. मार्केटिंग फेडरेशनला ३० रुपये किलो प्रमाणे पेमेंट मिळणार आहे.स्वस्त धान्य विक्रेत्यांकडून ३१ रुपये किलोप्रमाणे तुरडाळीची रक्कम जमा केली जाणार आहे. महाराष्टÑ स्टेट मार्केटिंग फेडरेशनला ३० रुपये किलोप्रमाणे पेमेंट मिळणार आहे.खुल्या बाजारातील तूरडाळ विक्रीवर परिणामखुल्या बाजारात चांगल्या प्रतीची तूरडाळ ६५ रुपये तर सव्वा नंबर तूरडाळ ५० रुपये किलो आहे. त्यामुळे ३५ रुपये दराने मिळणाºया सरकारी तूरडाळीला सर्वसामान्य ग्राहकांतून मोठा प्रतिसाद मिळणार आहे. परिणामी खुल्या बाजारातील तूर डाळीच्या विक्रीवर परिणाम होणार आहे. ५५ रुपये किलो दराने विक्रीस काढलेल्या या डाळीचे विक्रेत्यांसाठी ३ रुपये मार्जिन होते. आता विक्रीभाव ३५ रुपये व मार्जिन ४ रुपये केले आहे.
मागणी वाढेलबीड जिल्ह्यात एप्रिलमध्ये २५० क्विंटल तूर डाळीचे स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाटप झाले. मे- जूनसाठी ५०० क्विंटल तूर डाळीची मागणी केली आहे. ५५ रुपये भाव होते. विक्रेते इच्छुक नव्हते. आता ३५ रुपये विक्री भाव आणि ४ रुपये प्रती किलो मार्जिनमुळे मागणी वाढेल.- ए. टी. झिरवाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड.