माजलगाव : देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी घरादाराची होळी करीत या लढ्यात आहुती दिली. त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास महाराष्ट्रच्या इतिहासात लिहिण्यासाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करून हा इतिहास लिहिला जाईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी येथे एका कार्यक्रमात दिले.
अध्यक्षस्थानी आ. प्रकाश सोळंके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजीमंत्री बदामराव पंडित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, बाबूराव पोटभरे, जयसिंग सोळंके, संभाजी शेजूळ, कल्याण आबुज, सोनाली खुळे आदी उपस्थित होते.
...
माजलगाव धरणाला सुंदर सागर नाव देणार
बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत हरितक्रांती निर्माण करण्यासाठी ज्यांनी माजलगाव धरणाची निर्मिती केली, त्या माजलगाव धरणाला सुंदर सागर हे नाव देण्यासाठी लवकरच जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन निर्णय घेणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या इमारतीसह जिल्ह्यातील इतर पंचायत समितीच्या इमारती बांधकाम व फर्निचरसाठी निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाचे पंचनामे आठ दिवसांत पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.