अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर पणन मंत्र्यांनी प्रशासकीय मंडळ नेमले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा तत्कालीन संचालक मंडळ अस्तित्वात आले होते. मात्र शासनाने पुन्हा प्रशासक नेमला. त्यानंतर पणन मंत्र्यांनी यापूर्वी नेमलेल्या प्रशासकीय मंडळाला पुन्हा मान्यता दिल्याने अंबाजोगाई बाजार समितीवर गोविंदराव देशमुख यांची प्रशासकीय मंडळाच्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती केली. १२ मे रोजी जिल्हा निबंधकांनी प्रशासकीय मंडळाच्या पुनर्स्थापनेला परवानगी दिल्यानंतर आ. संजय दौंड ,माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख ,माजी चेअरमन विलासराव सोनवणे ,सत्यजित सिरसाट,स.निबंधक तथा प्रशासक पोतंगले ,ॲड. प्रविण मेटे ,सरपंच राजाभाऊ शेप , जयसिंग लोमटे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून गोविंद देशमुख यांनी तसेच सदस्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मार्केट कमेटीचे प्रभारी सचिव जाधव ,माजी सचिव लोमटे तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रशासकीय मंडळात मुख्य प्रशासकपदी गोविंदराव देशमुख ,प्रशासक म्हणून अर्जुन वाघमारे ,शेख आलताफ ,अमर देशमुख, माणिकराव कातकडे ,विलास मोरे ,आबासाहेब पांडे, दत्तात्रय यादव ,सौ रिना सिरसाट, प्रकाश सोळुंके अशा दहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पणन मंत्र्यांनी आमच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पदभार घेतला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पणन मंत्र्यांनी मार्केट कमेटीच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भात परवानगी दिली आहे. त्यानुसार अंबाजोगाई मार्केट कमेटीच्या वतीने अंबाजोगाई किंवा घाटनांदूर येथील मार्केट कमेटीच्या परिसरात कोरोना बाधित रुग्णांसाठी हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे.-गोविंदराव देशमुख, मुख्य प्रशासक, कृ. उ. बा. स. अंबाजोगाई.
===Photopath===
140521\img-20210205-wa0114_14.jpg