गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रारंभीच अमरसिंह पंडित यांच्या नियोजनामुळे राष्ट्रवादीला विजयी सलामी मिळाली. गोविंदवाडी ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार प्रभाग क्रमांक १ मधून कल्पना अच्युत मराठे, बाबूराव हरिभाऊ मोरे व कारभारी साहेबराव बिचकुले तसेच प्रभाग क्रमांक २ मधून किसकिंदा बाबा शिंगाडे, द्वारका बाबूराव कदम आणि प्रभाग क्रमांक ३ मधून आरती अशोक हातागळे व अविनाश प्रल्हाद आडे यांच्या विरोधात कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले. ३१ डिसेंबर रोजी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी गेवराई पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. आसाराम मराठे, अच्युत मराठे, देवराव बिचकुले, तुकाराम नरवडे, गणेश मोरे, देव मराठे, नितीन पेजगुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोविंदवाडी ग्रा.पं. बिनविरोध; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:23 AM