शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

निवडणुकीला गालबोट, जुन्या वादातून फ्री स्टाइल हाणामारी, आमदार पुत्रासह ९१ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 2:35 PM

शिराळमध्ये दोन गट समोरसमोर आले, त्यानंतर जुना वाद उफाळून आल्याने झाली फ्री स्टाइल हाणामारी

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लावणारी घटना १६ डिसेंबरला घडली. जुन्या वादातून दोन गट समोरासमोर भिडले. परस्परविरोधी फिर्यादीवरून ९१ जणांवर आष्टी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आमदार बाळासाहेब आजबे यांच्या पुत्राचाही यात समावेश आहे.

सचिन शत्रुघ्न आजबे (रा. शिराळ) यांच्या फिर्यादीनुसार, गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जुन्या वादातून शिवीगाळ करत त्यांच्यासह इतर दोघांना मारहाण केली. यावेळी खिशातील रोख रक्कम व दागिने काढून घेतले. यावरून संग्राम विलास आजबे, महेश चंद्रकांत आबे, आमदार बाळासाहेब आजबे यांचे पुत्र यश, गणेश दत्तात्रय आजबे, ज्ञानेश्वर रोहिदास जगताप यांच्यासह इतर ५० जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. दुसऱ्या गटाकडून ज्ञानेश्वर रोहिदास जगताप यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, लाकडी दांडे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून संग्राम आजबे यांच्या खिशातील ५ हजार रुपये व सोन्याची चेन काढून घेतली. याबाबत संजय छत्रभूज आजबे, सचिन छत्रभूज आजबे, ज्ञानेश्वर विकास आजबे, सागर पंढरीनाथ आजबे, विनोद आजिनाथ रोडे, वृदेश्वर बबन आजबे व इतर ३० जणांवर गुन्हा नोंद झाला.

गावात तणावपूर्ण शांतताहाणामारीचे कारण जुना वाद हे जरी असले, तरी ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकीय वैराची किनार असल्याचे सांगितले जाते. शिराळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या गटात चुरशीची निवडणूक होती. गावात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेनंतर आष्टी ठाण्याचे पो. नि. सलीम चाऊस यांनी गावात भेट देत शांततेचे आवाहन केले. तपास उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतCrime Newsगुन्हेगारी