: केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेंतर्गत नाफेडमार्फत माजलगाव येथे बुधवारी हरभरा पिकाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. या हरभऱ्यास ५ हजार १०० रुपये भाव मिळाला आहे.
ॲड. रामराव नाटकर कृषी निविष्ठा सहकारी संस्थेमार्फत जुना बाजार रोडवरील मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते काटापूजन करून खरेदीचा शुभारंभ झाला. यावेळी पहिल्या शेतकऱ्याचा सत्कार केला. हरभरा खरेदीसाठी १५९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या हरभऱ्यास ५ हजार १०० रुपये हमीभाव देण्यात आला. शेतकऱ्यांना नोंदणीबाबत अडचण आढळून आल्यास जुना मोंढा येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन अमित नाटकर यांनी केले आहे. यावेळी शेतकी संघाचे प्रशासक आबासाहेब फाळके, बाजार समितीचे सभापती संभाजी शेजूळ, समाजकल्याण सभापती कल्याण आबुज, अच्युत लाटे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष एन. टी. सोळंके, जयदत्त नरवडे, संजय पोहरे, महादू ताकट, बाळासाहेब जोगडे, राजेश डवले हे उपस्थित होते. प्रास्ताविक अमित नाटकर यांनी केले. आभार ॲड. नारायण गोले यांनी मानले.
===Photopath===
090621\purusttam karva_img-20210609-wa0040_14.jpg