सिरसाळा : शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाढवून द्यावे व नवीन पीक कर्ज तात्काळ वाटप करण्यास सुरुवात करावी, या मागणीसाठी भाजपचे मुन्ना काळे व कपिल चोपडे आपल्या सहकाऱ्यांसमावेत महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, शाखा सिरसाळा येथे बेमुदत उपोषणास बसले होते. उपोषणाची ग्रामीण बँकेने दखल घेतली असून, मागण्या मान्य केल्या आहेत.
नवीन पीक कर्ज प्रकरणे एका महिन्यात निकाली काढू व नवे जुने पीक कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील वाढीव पीक कर्ज देण्यात येईल, असे लेखी आश्वासन बॅंकेचे आरओ दिलीप कड व व्यवस्थापक अशोक अर्धापुरे यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे व उपोषण मागे घेण्यास विनंती केली.
मागणी मान्य झाल्याने उपोषणकर्ते मुन्ना काळे, कपिल चोपडे, बाळू पांडे, राजेभाऊ ऊजगरे, भगवान राजे कदम, धर्मा मेंडके, केशव बन्सोडे, रवी चाटे, तौफिक भाई सिद्दीकी यांनी उपोषण मागे घेतले आहे. यावेळी पोलीस प्रशासनचे सिरसाळा पोलीस स्टेशन प्रभारी एकशिंगे, पो काॅ अक्षय देशमुख, आर्शद, बॅंक कर्मचारी फपाळ उपस्थित होते. नायब तहसीलदार रुपनर, तलाठी युवराज सोळंके हे देखील उपोषणस्थळी आले होते. उपोषणास जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब किरवले, मधुकर किरवले, डाॅ. जे. एन. शेख, गोविंद होनमने, बाळू भैय्या सोळंके, लखन गायकवाड, सुदाम देशमुख, सुरेश कराड, हेमंत लोंढे आदींसह अनेकांनी भेटी दिल्या.
धंनजय मुंडे यांनी घेतली दखल
सिरसाळा महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेसमोर पीक कर्जासंदर्भात शेतकरी उपोषणास बसले आहेत. ही बाब संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष राजेभाऊ पौळ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कळवली. याची दखल धनंजय मुंडे यांनी घेतली. बॅंक अधिकाऱ्यांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून संपर्क करून पीक कर्जासंदर्भातील उपोषणकर्त्यांच्या मागण्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना केल्या.
130821\13bed_10_13082021_14.jpg
उपोषणाची ग्रामीण बँकेने घेतली दखल