बीड : तालुक्यातील आहेरवडगाव येथे कार्यरत असेलेले ग्रामसेवक आनंद कुलकर्णी यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.आनंद अनिलराव कुलकर्णी हे ग्रामसेवक म्हणून आहेरवडगाव येथे कार्यरत होते. येथील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली जागेची नोंद ग्रामपंचायतला करून पीटीआर ची मागणी ग्रामसेवक कुलकर्णी याच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान त्याने या जागेचा पीटीआर देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच संबंधित व्यक्तीकडे मागितली होती. याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सापळा रचला होता. याचवेळी बीड शहरातील शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर संबंधित व्यक्तीला लाचेचे पैसे घेऊन बोलावले होते. त्याच वेळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. कुलकर्णी याला ताब्यात घेऊन त्याच्यावर शिवाजीनगर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथील प्रभारी पोलीस उपाधीक्षक राजकुमार पाडवी, रविंद्र परदेशी, गदळे, वीर, सय्यद यांनी केली.
लाच स्वीकारताना ग्रामसेवक आनंद कुलकर्णी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:06 AM
तालुक्यातील आहेरवडगाव येथे कार्यरत असेलेले ग्रामसेवक आनंद कुलकर्णी यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
ठळक मुद्देजागा नावावर करण्यासाठी मागितली लाच