वडवणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी व उपाययोजना कोविड केअर सेंटरमध्ये कशा पद्धतीने राबविण्यात येतात याची पाहणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार रात्री थेट ११ वाजता शहरातील कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये पोहोचले. रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासण्यास सुरुवात केली. वयोवृद्ध रुग्णांची तपासणी करत काही होत नाही, घाबरू नका, औषधे वेळेवर घ्या, काही अडचण असल्यास तत्काळ डॉक्टरांना सांगा. स्वतःची काळजी घ्या, लवकर बरे व्हा म्हणत डॉ. पवार यांनी रुग्णांना धीर दिला. कोविड केअर सेंटरमधील वाॅर्डमध्ये जाऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. सेंटरमधील प्रसाधनगृहाची पाहणी करून शौचालय व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल शिंदे, शाम थोटे, स्टाफ नर्स खोटे, वाॅर्डबाॅय कल्पना दिवटे उपस्थित होते. तालुक्यातील शहरी भागात व ग्रामीण भागात कोरोनाचे संकट वाढत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. पवार यांनी नगारिकांना केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी वडवणी येथील कोविड केअर सेंटरला गुरुवारी रात्री अचानक भेट देऊन पाहणी केली.
===Photopath===
070521\20210506_224720_14.jpg