शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ डॉक्टरांविषयी कृतज्ञता; अपंगांना प्रमाणपत्र पुरविण्याची मोफत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 4:43 PM

मित्रा साठी एक दिवस धंदा न करता सेवा करायची. दुकान उघडायचे. सेवा द्यायची पण पैसे घ्यायचे नाहीत. 

अंबाजोगाई (बीड): कर्करोगाच्या आजाराने पोटच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. आज त्याच्या स्मृती प्रित्यर्थ वडिलांनी स्वाराती रुग्णालयातील डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान केला. जे अपंग व्यक्ती प्रमाणपत्र काढतात त्यांना मोफत कागदपत्रे उपलब्ध करून देत, त्यांना चहापाणी व गुलाबपुष्प देऊन सत्कार, असा हा अनोखा उपक्रम खाणावळवाले बाबूभाईं उर्फ मुस्तफा खान यांनी मंगळवारी रुग्णालय परिसरात राबविला. एक सामान्यव्यक्ती ही समाजासाठी असामान्य कार्य करू शकते.याचा प्रत्यय बाबूभाईंनी समाजासमोर ठेवला आहे.

आज वेगवेगळे पक्ष, संघटना, मंडळे कार्यक्रम घेत असतात. पण हा कार्यक्रम ना पक्षाचा, ना संघटनेचा, ना कोण्या पुढाऱ्याचा. हा  कार्यक्रम आहे, अगदी सामान्य लोकांचा. बाबू भाई (मुस्तफा खान) हे डबे पोचवणारी खानावळ चालवतात. मेडिकल कॉलेजच्या समोर अनेक वर्षे चहाचे हॉटेल चालवले. त्यांचा मुलगा मोहसीन नुकताच हाताला आला होता. तेवढ्यात त्याला कॅन्सर झाला. त्यात तो गेला. बाबूभाईनी त्यासाठी जी धडपड केली. त्याला तोड नाही. या काळात डॉक्टर लोकांचे काम त्यांना जास्त जवळून पाहता आले. खरे तर डॉक्टर लोकांशी त्यांची खूप जुनी मैत्री. पण या अनुभवाने त्यांना हळवे केले.

तरुणपणातील मैत्री वाहवत जाते. असे म्हटले जाते पण ते सर्वांसाठी खरे नाही. मोहसीनचे जग म्हणजे मेडिकलचे गेट. येथील तरुणाचा तो लाडका होता. त्याच्या मित्रानी ठरवले आपल्या मित्रा साठी एक दिवस धंदा न करता सेवा करायची. दुकान उघडायचे. सेवा द्यायची पण पैसे घ्यायचे नाहीत. या निमित्ताने डॉक्टरांचा सत्कार केला जाणार आहे. हा छोटेखानी कार्यक्रम आज सकाळी १० वाजता मेडिकलच्या गेटवर झाला.किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते तथा जेष्ठ पत्रकार अमर हबीब, पत्रकार अविनाश मुडेगावकर  यांना त्यांनी कार्यक्रमात सामील करून घेतले.कोणताच हेतू नाही. कोणताच लाभ मिळवायचा नाही. कोणतेच पुढारपण नाही, कोणत्याच विचारधारेचा प्रचार नाही, तरीही एक कार्यक्रम होत आहे. सामाजिक उपक्रम कसा राबवावा याचा जणू आदर्श वास्तूपाठच बाबूभाईंनी समाजासमोर ठेवला आहे.

यांचा झाला सन्मानबाबूभाई व त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत प्रभारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा व इतर डॉक्टरांचा सत्कार केला. आज दिवसभर जे अपंग व रुग्ण  प्रमाणपत्र काढण्यासाठी आले.त्यांना सर्व कागदपत्रे मोफत उपलब्ध करून दिली. तसेच यासर्व व्यक्तींना दिवसभर चहापाणी उपलब्ध करून दिले. त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष महादू मस्के, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव भुंबे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिक