बीड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला आदर्श राज्यघटना दिली. जगातील संसदीय लोकशाहीचे पुनरुज्जीवन झाले. राज्यघटनेद्वारे प्रत्येक नागरिकास हक्क व अधिकार देऊन आदर्श नागरी जीवनाचा पाया घातला. सामाजिक व भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या देशाला एकसंघ केले. स्त्री- पुरुष भेदाभेद नष्ट करण्यासाठी स्त्रियांना अधिकार प्रदान केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमांतून सर्वांना समान अधिकार मिळाले, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय, बीड व शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पुष्पहार घालून बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन केले. यावेळी विक्रांत हजारी, अजय सवाई, किरण बांगर, भगीरथ बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, शांतीनाथ डोरले, अनिल चांदणे, नागेश पवार, शहाजी गायकवाड, प्रमोद रामदासी, फारूकभाई, विलास बामणे, विठ्ठल ठोकळ, दत्ता परळकर, अमोल वडतिले, नरेश पवार, विजय गायकवाड, शरद बडगे, अनिल शेळके, बद्रीनाथ जटाळ आदी उपस्थित होते.
===Photopath===
140421\14_2_bed_8_14042021_14.jpeg
===Caption===
बीड येथील भाजप पक्ष कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.