प्राचार्य डॉ. वसंत सानप यांच्या हस्ते प्रतिमापूजनानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, डाॅ. गणेश मोहिते, प्रा. सुधाकर ढवळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डाॅ. भारत दहे, डाॅ. सूचिता खामकर, डाॅ. बापू जाधवर, डाॅ. मनोहर सिरसाट, डाॅ. राजेंद्र चौहान, डाॅ. रवींद्र काळे, डाॅ. ईश्वर छानवाल, डाॅ. अरविंद आघाव, प्रा. अनिल चिंधे, प्रा. प्रशांत विभुते, प्रा. संदीप परदेशी, डाॅ. मारोती यमुलवाड, प्रा. योगेश भराटे, प्रा. दन्ने, प्रा. महारूद्र जगताप, प्रा. जगताप, प्रा. महादेव शिंदे, प्रा. वावरे, प्रा.एम.एन. चौरे, प्रबंधक भास्कर सुरवसे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कालिकानगरात जयंती कार्यक्रम
बीड : येथील कालिकानगरातील के.एस.पी. विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र जोगदंड, प्रमुख पाहुणे शिनगारे, फुलझळके, प्र. मुख्याध्यापक जगदीश शिंदे संस्थाध्यक्ष अंजली शेळके यांची उपस्थिती होती. यावेळी श्वेता भोसले या विद्यार्थिनीने स्वामी विवेकानंद यांच्याविषयी भाषण केले.
के.एस.के. महाविद्यालयात कार्यक्रम
बीड : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.