...
बसस्टँडवर तळे; परिसर बनला चिखलमय
शिरूर कासार : प्रतीक्षा करत असतानाच अखेर उशिरा का होईना सोमवारी रात्री धुव्वाधार पाऊस बरसला. या पावसाने नैराश्याचे वातावरण बदलून टाकले. मात्र, बसस्टँडमध्ये डांबरीकरण नसल्याने चिखल झाला. प्रवाशांना चिखल तुडवत जावे लागत होते तर शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचलेले चित्र दिसून येत होते.
....
कलशारोहण कार्यक्रम स्थगित
शिरूर कासार : मंगळवार, बुधवार दोन दिवस येथील कपिलेश्वर मंदिराच्या शिखरावर कलशारोहण कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या कापरी नदीला पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने भाविकांना त्रासाचे होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रमच तूर्तास महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या आज्ञेवरून स्थगित करण्यात आला असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
...
जन्माष्टमी साध्या पद्धतीने साजरी
शिरूर कासार : सोमवारी कृष्णाअष्टमी उत्सव होता परंतु कोरोनाचे निर्बंध अद्याप कायम असल्याने सामूहिक व मोठ्या जल्लोषात साजरा होणारा हा जन्मोत्सव घरोघरी महिलांनी साध्या पद्धतीने साजरा केला तर आपल्या घरीच पाळण्यात कृष्णाप्रती असलेली श्रद्धा जोपासली.घरोघरी जन्माष्टमी उत्साहात साजरी झाली.
..
पावसामुळे वीजपुरवठा खंडित
शिरूर कासार : पाऊस आला रे आला की वीज गायब होणे नित्याचेच असते. सोमवारी रात्री पुन्हा एकदा प्रत्ययाला आला. रात्री साधारणपणे दहा साडेदहा वाजता पाऊस सुरू झाला तशी लाईट गायब झाली. ती रात्रभर आलीच नसल्याने रात्र अंधारात काढावी लागली. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
...