बीड : आंतर जिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान खोटी, चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती भरणाऱ्या ४१५ शिक्षकांच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर या शिक्षकांची गुरुवारी वरिष्ठ अधिका-यांसमक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अनेक शिक्षक दोषी आढळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा तसेच जिल्हांतर्गत बदल्या मे- जूनदरम्यान झाल्या होत्या. या प्रक्रियेत काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याबाबत अन्याय झालेल्या शिक्षकांनी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने तालुका पातळीवर सुनावणी झाली होती. गटशिक्षणाधिका-यांच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १८ शिक्षकांनी चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचे स्पष्ट झाले. या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. मात्र यानंतरही तक्रारींचा ओघ सुरु होता. त्यामुळे जि. प. प्रशासन व शिक्षण विभागाकडे आलेल्या ४१५ तक्रारींची गुरुवारी सुनावणी होणार आहे.दोघांनाही बोलावलेबदली झालेले शिक्षक व त्यांच्या जागेसंदर्भात तक्रार करणारे शिक्षक या दोघांना या सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. वर्ग - १ चे अधिका-यांसमोर ही सुनावणी होणार आहे.अनेक शिक्षक झाले विस्थापितअपंग व मतीमंद पाल्याच्या दाखल्याचा वापर केवळ बदलीमधून सवलत मिळण्यासाठी अनेक शिक्षकांनी केला होता. समाज कल्याण विभागाचे प्रमाणपत्रही जोडले नव्हते. पती- पत्नी एकत्रीकरणासाठी अंतर चुकीचे दाखवून दिशाभूल करण्यात आली. तर पोलीस पाटील, रेशन दुकानदार, बोगस संस्थेचे कर्मचारी, पतसंस्थेचे कर्मचारी दाखवून काही शिक्षकांनी पती- पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेतला आहे. घटस्फोटीता, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यामध्ये काहींनी चूकीची माहिती भरुन दिशाभूल केली आहे. संवर्ग-१ व संवर्ग-२ मध्ये माहिती भरणाºया ७० टक्के शिक्षकांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती भरल्याने अनेक शिक्षक विस्थापित झाल्याने या तक्रारी आल्या होत्या.