परळी : बरकत नगर रोडवर संभाजीनगर ठाण्यातील पोलिसांनी एका वाहनातून २ लाख ५६ हजार रुपये किंमतीचे तंबाखूजन्य गुटख्याचे २० पोते जप्त केले. लॉकडाऊन काळातही शहरात गुटख्याची अवैध वाहतूक आणि विक्री होत असल्याची चर्चा आहे.
परळीच्या एसबीआय बॅंकेचे ५ अधिकारी कर्मचारी कोरोना बाधित झाल्याचे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर परळीत रविवारपासून संचारबंदी लागू केली आहे, सोमवारी गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली. बीड येथील अन्न व औषध विभागास याची माहिती देण्यात आली आहे. तेथील अधिकारी आल्यानंतर गुन्हा दाखल होईल अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार .यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह .व्यकंट भताने, पो.ना. दंत्ता गित्ते, पो.ना. बाबासाहेब आचार्य यांनी केली.
माल वाहतुकीचा परवाना या कारवाई दरम्यान, माल वाहतुकीची परवानगी घेऊन वाहन चालकाने गुटख्याची अवैध वाहतूक केली असल्याचे उघडकीस आले आहे. लॉकडाऊनमध्येही गुटखा माफियाकडुन परळीत बिनदिक्कत गुटखा पुरविला जात आहे. दरम्यान, मुख्य गुटखा विक्रेत्यावर मात्र कारवाई होत नाही अशी चर्चा आहे.