लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक ठिकाणी गुटख्याचा ठोक पुरवठा करणाऱ्या गुटखा विक्रेत्यावर शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीसअधिकारी श्रीकांत डिसले व सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह जवळपास ३४ लाख ५० हजार रुपयांच्या मुद्देमालासह गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे.माजलगाव तालुक्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुटख्याचा होलसेल व्यवसाय करणाºया येथील रवी सक्राते हा रात्री १२ वाजता येथील मोंढा भागात असलेल्या आपल्या गोडाऊनमधून टेम्पो (एम.एच.१३-६९६८) व छोटा टेम्पो (एम.एच.४४ यु ०८५७) यामध्ये गुटखा घेऊन बाहेर गावी विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती खब-या मार्फत डीवायएसपी श्रीकांत डिसले यांना मिळाली. त्यानंतर ते आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचून दोन्ही वाहने ताब्यात घेतली. गुटखा विक्रे ता रवी संक्राते हा मात्र पळ काढण्यात यशस्वी झाला.या दोन्ही वाहनांसह गोदामातील जवळपास गुटख्याची ३० पोती जप्त केली. ज्याची किंमत जवळपास २२ लाख ५० हजार इतकी आहे. तर दोन्ही वाहनांची किंमत १२ लाख ५० हजार रुपए होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त केलेला गुटखा अशोक सक्राते याचा असल्याचे पोलीसांनी सांगितले.उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुटखा पकडल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांना पाचारण करण्यात आले. ते आल्यानंतर संबंधित व्यक्ती व वाहनांवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदरील कारवाई उपअधीक्षक श्रीकांत डिसले व शैलेश गादेवार, रवि राठोड व खराडे आदी पोलिस कर्मचाºयांनी केली.गुटखा विक्रीचा धंदा जुनाच, कारवाई उशिरासदरील गुटका विक्रेत्याचा अनेक वर्षांपासून गुटका विक्रीचा व्यवसाय आहे. तो संपुर्ण मराठवाड्यात गुटखा पुरवण्याचं काम करतो. परंतु, पहिल्यांदाच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.त्याचा हा धंदा हा पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासनातील अधिका-यांशी हातमिळवणी करुन सुरु होता.मात्र, त्याच्यावर उप अधीक्षक डिसले यांनी कारवाई केल्यामुळे या धंद्यातील व इतर अधिका-यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.गुटखा विक्री करणारा तो विक्रेता आहे, हे माहिती असताना देखील त्याच्यावर कारवाई होण्यासाठी एवढा उशिर का केला असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
माजलगावात ३४ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 1:07 AM