बीड : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी या ठिकाणी एका बंद वाहनातून तब्बल ४ लाख १७ हजार ३०० रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला. या कारवाईत दोन लाख रुपये किंमतीचे टाटा कंपनीचे वाहनही जप्त करत एकूण ६ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक प्रमुख उपनिरीक्षक अभिजीत आडके व कर्मचारी हे पेट्रोलिंगसाठी अंबाजोगाई तालुक्यातील बदार्पूर परिसरात फिरत होते. याच दरम्यान एका वाहनामध्ये गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीची खात्री करत अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे पथकाने एक चारचाकी वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्या बंद वाहनात गुटख्याचे पोते आढळून आले. त्याची अंदाजे किंमत ४ लाख १७ हजार ३०० रुपये आहे. वाहन चालक सुरज दत्तोबा खंडापुरे यास ताब्यात घेऊन पोलिसांनी गुटखा व वाहन जप्त केले.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पो.शि. एस.एस.शेख, विठ्ठल राठोड, गणेश नवले, हनुमंत राठोड यांनी केली. याची माहिती अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आली असून त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
साळुंकवाडीत ४ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:08 AM
लीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी या ठिकाणी एका बंद वाहनातून तब्बल ४ लाख १७ हजार ३०० रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला.
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई