शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

बीडमध्ये २५ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:10 AM

अहमदाबादहून कर्नाटककडे गुटख्याचा ट्रक भरून जात होता. हीच माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा लावून बीड बायपासवर टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल २५ लाख रूपयांचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. तसेच १० लाख रूपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : अहमदाबादहून जात होता कर्नाटकात

बीड : अहमदाबादहून कर्नाटककडे गुटख्याचा ट्रक भरून जात होता. हीच माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी सापळा लावून बीड बायपासवर टेम्पो अडविला. यामध्ये तब्बल २५ लाख रूपयांचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. तसेच १० लाख रूपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला. चालकाला ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.अहमदाबादहून एका टेम्पोमध्ये (जीजे ०१ ईटी २३६८) गुटखा भरून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी तात्काळ आपल्या पथकामार्फत बीड बायपासवर सापळा लावला. बंद टेम्पो अडविला. उघडनू पाहिले असता त्यामध्ये गुटख्याने भरलेल्या जवळपास १०० पोते असल्याचे दिसले. हाच टेम्पो नंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आला. यावेळी चालक जालुरे इरफान अहमद हुसेन (२९ रा.अहमदाबाद) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती देऊन गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोनि पाळवदे यांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनमश्याम पाळवदे, पोह परमेश्वर सानप, साजेद पठाण, विकी सुरवसे, प्रदीप सुरवसे, चालक संजय जायभाये आदींनी केली.चालकाकडून दिशाभूलबीड बायपासवर पोलिसांनी टेम्पो अडविला त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता टेम्पो रिकामा आहे, कर्नाटकमध्ये चाललो आहे, असे खोटे सांगितले. पोलिसांना संशय वाटल्याने तपासणी केली, यावेळी टेम्पोमध्ये गुटख्याने भरलेली जवळपास १०० पोती आढळून आले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस