ग्रामीण पोलिसांनी करून गुन्हा दाखल केला.
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना पात्रूड याठिकाणी गुटखा उतरवला जाणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी पात्रूड येथे जाऊन कारवाई केली. नईम मोमीन यांच्या दारात पिकअप एमएच-२५ ईजी-००६५ हा उभा होता. त्याठिकाणी पोलीस गेले असता यातील आरोपी फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेतली असता नईम मोमीन यांच्याकडे हा गुटखा उतरवण्यात येणार होता.
या पिकअपमध्ये बाबा, गोवा व बाबापत्तीच्या १८ बॅग मिळून आल्या. याची किंमत ६ लाख ३२ हजार ६० रुपयेइतकी होती.
पोलिसांनी या पिकअपसह गुटखा ताब्यात घेऊन बुधवारी दुपारी पोलीस नाईक दीपक अरुण पवार यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांसात अज्ञान व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके, रवी राठोड, दीपक पवार, विलास खराडे, गोविंद बाबरे, विलास खराडे व विलास यशवंत आदीी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.