बीड : परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील देविदास मुंडेवरील गोळीबार हा गुटख्याच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुस-या दिवशीही जखमी मुंंडेंने वेगवेगळ्या स्टोरी बनवून पोलिसांना तपासात असहकार्य केल्याचे समजते. परंतु तपासाच्या दृष्टिकोणातून संशयितांची चौकशी केली जात आहे. खुद्द अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत.
देविदास मुंडे हा शुक्रवारी रात्री तो ज्या मित्रांसोबत गेला होता, त्यांची पोलिसांनी चौकशी केली. तसेच त्याचे कॉल डिटेल्सही काढण्यात आले. यातील संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. परंतु पोलिसांना ठोस असा पुरावा हाती लागला नाही. मुंडेची सोमवारी चौकशी केली असता त्याने पुन्हा बनवाबनवीच्या स्टोरी करून पोलिसांची दिशाभूल केली. एकदा गुटख्याचे कारण सांगितले जाते तर एकदा मित्रांचे. पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या पद्धतीने तपास सुरू केला.
मित्रांसोबत केलेल्या पार्टीत कोणाकडून तरी मिसफायर होऊन गोळी मुंडेला लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. सोमवारी याची चौकशी केली असता हा अंदाज चुकीचा ठरला. मुंडेची पुन्हा चौकशी केली असता त्याने पुन्हा गुटख्याचे कारण सांगितले. स्टोरीत तीनवेळेस गुटख्याचे कारण आल्यानंतर पोलिसांनी तपासावर जोर दिला. यामध्ये मुंडेंने केलेल्या वर्णनाच्या एका व्यक्तिची ओळख पटली असून शोधासाठी पोलीस रवाना झाले.
कमी पैशात गुटख्याचा सौदा!देविदास मुंडे याची टपरी आहे. तो समोरच्या व्यक्तीकडून कमी पैशात गुटखा खरेदी करणार होता. शुक्रवारीही निर्मनूष्य ठिकाणी हा सौदा होणार होता. परंतु यामध्ये त्यांचे ‘पॅचअप’ झाले नाही. यातूनच हा गोळीबार झाल्याचा अंदाज आहे. परंतु अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.